विविध मांगण्यासह सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसचा मोर्चा|

Lokmat samachar
सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सभेला संबोधित करतांना अब्दुल समीर म्हणाले की सरकारने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले अन्यथा युवक कॉंग्रेसतर्फे याहीपेक्षा मोठे आंदोलन काढण्यात येईल. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऋत्विज जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन व इतर कॉंग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.