व्यसनमुक्त पिढीसाठी संत साहित्याचे वाचन आवश्यक- अब्दुल सत्तार.

Sakal
सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे सोमेश्वर गिरी महाराज (तपोवन) यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याच्या समाप्ती कार्यक्रमात आ. अब्दुल सत्तार यांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलतांना आ. सत्तार साहेब म्हणाले की, व्यसन हे समाजाला लागलेला कलंक असून, सुसंस्कृत व व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी तरुणांनी संत साहित्याचे वाचन करून धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.