शिक्षकांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धत आवश्यक- अब्दुल सत्तार.

Punya Nagari
शिक्षण विभागाचा निधी परत गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हापरिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता लयास गेली असून गुणवत्ता सुधारायची असेल तर शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने केली पाहिजे तरच शाळेची गुणवत्ता सुधारू शकते.