प्रसिध्दीपत्रक

खा.अशोकरावजी चव्हाण साहेबांचे जल्लोषात स्वागत.

महाराष्ट्र राज्याचे पूर्व मंत्री व खा. मा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे औरंगाबाद येथील चिकलठाण विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना भेटण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्षाचे इतर मान्यवरही उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते बाळापुर (ता. सिल्लोड) येथे शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आ. सत्तार साहेब म्हणाले की, शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जीवन जगावे व वाईट परिस्थितीचा धैर्याने सामना करावा.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून खा. अशोकरावजी चव्हाण साहेबांचा सत्कार.

कॉंग्रेसच्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री व खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल मुंबई येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला

अधिक वाचा

खा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिल्लोड मध्ये जल्लोष.

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची निवड झाल्याबद्दल सिल्लोड येथे कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, किरण पवार, शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, अकिल वसईकर इत्यादींची उपस्थिती होती.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून आगीत मृत मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत.

शुक्रवार दिनांक २७ रोजी अजिंठा येथील साबेर खा सब्बीर खा यांच्या घराला आग लागली होती या आगीमध्ये दीडवर्षीय मुलगी मृत्युमुखी पडली. आ. अब्दुल सत्तार साहेबांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन वैयक्तिक रोख पन्नास हजार रुपयांनी मदत केली.

अधिक वाचा

शेतकऱ्यांना निराश करणारा अर्थसंकल्प- आ. अब्दुल सत्तार.

वित्त मंत्री श्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेल्या घोषणा आणि प्रत्यक्ष कृति यामध्ये विरोधाभास निर्माण होत असून नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठलीही ठोस योजनेची तरतूद केलेली नाही त्यामुळे ग्रामीण भागामध्ये केंद्राच्या या अर्थसंकल्पाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अधिक वाचा

घाटनांद्रा सोसायटीच्या संचालकांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार.

सिल्लोड येथील गांधी भवन मध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते घाटनांद्रा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर विजय मिळविलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या एकता विकास पनलच्या विजयी उमेद्वारांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

सिल्लोड कृउबा समिती कॉंग्रेसच्या ताब्यात.

सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने वर्चस्व राखले आहे. सभापती पदी सदाशिव तायडे तर उपसभापती पदी ठगन भागवत यांची निवड झाली आहे. मिरवणूक काढून या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला त्याच प्रमाणे फुलांचा हार घालून विजयी उमेद्वारांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

सिल्लोड कृउबा समितीवर आ. अब्दुल सत्तार साहेबांचे वर्चस्व.

अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतीच्या पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या कार्यकुशलतेच्या बळावर कृषी उत्पन्न बाजार समिती कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आली आहे. सभापती पदी सदाशिव तायडे तर उपसभापती पदी ठगन भागवत यांची निवड झाली आहे.

अधिक वाचा

सिल्लोड सोसायटीची निवडणूक बिनविरोध.

सिल्लोड विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून संस्थेवर आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. सिल्लोड येथील नगर परिषदेच्या सभागृहात बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा