प्रसिध्दीपत्रक

पाण्याचा वापर काटकसरीने करावा- आ. अब्दुल सत्तार

सिल्लोड विधानसभा मतदार संघामध्ये अत्यंत कमी पाऊस पडल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून या जल संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी जनतेला केले आहे. ते सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.

अधिक वाचा

आश्रम शाळेच्या बांधकामाचे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते उद्घाटन.

आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, आघाडी सरकारने आश्रम शाळांच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांची योजना मंजूर केली होती. या आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांना शैक्षणिक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन …

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते नागरी प्राथमिक रुग्णालयाचे लोकार्पण.

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नागरी प्राथमिक रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा दि. १८ फेब्रुवारी रोजी पार पडला. या याप्रसंगी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, गरजू, सर्वसामान्य रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी या हेतूने हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये याकरीता नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे …

अधिक वाचा

दिवंगत मा. आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली.

आ. अब्दुल सत्तार साहेब व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सिल्लोड येथील कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन.

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या अंभई येथील शेतकरी गणेश भीमराव रहाटे यांच्या कुटुंबियांची आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट घेवून सांत्वन केले.

अधिक वाचा

जनसामान्याचा नेता हरवला- आ. अब्दुल सत्तार.

महाराष्ट्राचे लाडके नेते मा. आर. आर. पाटील (आबा) यांचे निधन झाले आहे. या दुख:द प्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उत्कृष्ठ वक्ता, अभ्यासू आमदार, कुशल प्रशासक आपल्यात नाहीत, ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे विविध विकास कामाचा शुभारंभ.

मागास क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सिल्लोड शहरातील नगरपरिषद प्रभाग क्र.२ मधील न्यू श्री म्हसोबा नगर भागामध्ये रस्ता मजबुतीकरण, खडीकरण व नालीबांधाकामाचे उद्घाटन युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री व आ. अब्दुल सत्तार साहेबांची प्रमुख उपस्थिती होती.

अधिक वाचा

फर्दापूर रस्त्याच्या विकासासाठी ९० कोटींची तरतूद करावी- आ. अब्दुल सत्तार.

लवकरच शासनाच्या वतीने अर्थसंकल्प सदर होणार आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहे. औरंगाबाद-फर्दापूररस्त्यावरील घाटाच्या दुरुस्तीसाठी ९० कोटींची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी शासनाकडे केली आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत.

सिल्लोड शहरातील म्हसोबा गल्लीतील रहिवासी शेतकरी अशोक राजाराम डमाळे यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. सदरील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना युवक कॉंग्रेसच्या वतीने माजी मंत्री व विद्यमान आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.

अधिक वाचा

शिवाजी हासे याचा सत्कार.

मंगरूळ ता. सिल्लोड येथील शिवाजी श्रावण हासे याने नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आंतरराज्य ऑलम्पिक स्पर्धेत पदकाची कमाई केली त्या निमित्ताने आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यांनी शिवाजी हसेचा सत्कार केला.

अधिक वाचा