ना.अब्दुल सत्तार यांचे जनसंवाद अभियान आजपासून सुरु


ना अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव या मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच स्वतःला विकास कार्यामध्ये झोकून दिलेले आहे व त्यांच्या कल्पक वृत्तीमुळेच सिल्लोड सोयगाव मतदार संघाचा काय पालट झाला आहे. उपजतच विकासाची कास धरणाऱ्या ह्या नेत्याविषयी सर्व नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झालेली असून आपल्या कार्यकर्तुत्वाने साहेबांनी जन सामान्यांमध्ये एक वेगळीच छाप सोडली आहे यात तिळमात्र शंका नाही आणि आता हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून ना.अब्दुल सत्तार साहेब हे सिल्लोड व सोयगाव तालुक्यात जनसंवाद अभियानास सुरुवात करणार आहेत. या दरम्यान ते खेडेगावामध्ये मुक्कामी राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.यामुळेच दिवसेंदिवस साहेबांच्या समर्थकांची संख्या वाढत आहे.जनसामान्याच्या मिळणाऱ्या या पाठिंब्यामुळेच विकासाचे पंख लाऊन साहेब कार्य कर्तुत्वाची उत्तुंग भरारी घेत आहेत. साहेब प्रत्यक्ष कृती करतात, थेट नागरिकापर्यंत जातात त्यांच्या समस्या सोडवतात आणि हीच बाब त्याना इतरांपेक्षा वेगळ ठरविते…!

jansanvad