अजिंठा येथे नवीन पाईपलाईनचा शुभारंभ.

Bhaskar
अजिंठा गावात २२ किमी अंतर्गत नवीन पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ झाला असून पुढील तीन ते पाच महिन्यात अजिंठा वासियाचा पाणीप्रश्न पूर्ण मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन अब्दुल सत्तार यांनी अजिंठा येथे आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत केले आहे. दरम्यान अजिंठा अंधारी धरणात मुबलक पाणी साठा असतांना केवळ प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकले नाही असेही ते म्हणाले.