तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी सिल्लोड येथे विराट मोर्चा.

Sakal
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चामधील जनसमुदायाला उद्देशून बोलतांना ते म्हणाले की भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जनतेला जे आश्वासन दिले आहेत ते पूर्ण करावे, नाहीतर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.