दुष्काळ परिषदेची पूर्वतयारीची पैठणला बैठक.

sakal
सिल्लोड येथे २३ तारखेला कॉग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळ परिषदेचे आयोजन केले आहे. या दुष्काळ परिषदेस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या पूर्व तयारीबाबत पैठण येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी या दुष्काळी परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे.