पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी त्वरित उपाययोजना करा- अब्दुल सत्तार

Bhaskar
अब्दुल सत्तार साहेब आढावा बैठकीमध्ये बोलतानां म्हणाले की, ग्रामसेवक व तलाठी गावाचा केंद्र बिंदू असून प्रशासन व लोकप्रतिनिधींचा समन्वय असणे खूप महत्वाचे आहे.दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा, वीज इत्यादी गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे आहे. शेतातील उभी पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. म्हणून अधिकाऱ्यांना सूचना देतांना अब्दुल सत्तार साहेब पुढे म्हणाले की, संबधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तालुक्यातील सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याच्या संबधी कृती आराखडा तयार करावा.