सिल्लोड शहरात प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना.

सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व जय भवानी,  जय शिवाजीच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते. यानिमित्ताने शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याहस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींची उपस्थिती होती.