दुष्काळसदृश परिस्थितीवर अब्दुल सत्तार यांची शेतकऱ्यांशी चर्चा.

सिल्लोड व सोयगांव तालुक्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी आ. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत सिल्लोड शहरातील नर्मदाबाई मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

विविध जिल्ह्यामध्ये सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन.

औरंगाबाद भरती कार्यालय यांच्या अधिपत्याखाली नंदूरबार, हिंगोली, जालना नांदेड, बुलढाणा, परभणी औरंगाबाद, धुळे व जळगाव येथे सैन्य भरती मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेद्वारानी अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य नोकरी संदर्भातील माहितीसाठी वेळोवेळी www.abdulsattar.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक वाचा

सैन्य भरती मेळावा.

पुणे भरती कार्यालय यांच्या अधिपत्याखाली अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, पुणे येथे सैन्य भरती मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेद्वारानी अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य नोकरी संदर्भातील माहितीसाठी वेळोवेळी www.abdulsattar.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक वाचा

सर्व शिक्षा अभियान,जि.प.हिंगोली येथे कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी भरती.

सर्व शिक्षा अभियान,जिल्हा परिषद हिंगोली येथे कंत्राटी पद्धतीने(on contract basis) विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारानी अधिक माहितीसाठी कृपया http://zphingoli.applygov.com  या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०७ नोहेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.

अधिक वाचा

सिल्लोड मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कार्य करणार- आ.अब्दुल सत्तार.!

विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील जनतेचे आभार मानण्यासाठी घाटनांद्रा येथे दौरा केला. आपण सर्वांनी मिळून मतदारसंघाचा विकास करायचा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा

विकास कार्याच्या जोरावर अब्दुल सत्तार साहेब यांचा नेत्रदीपक विजय..!

  अब्दुल सत्तार साहेब सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले असून त्यांनी सदैव विकासाचेच राजकारण केले आहे. अब्दुल सत्तार साहेबांचा विजय हेच अधोरेखित करतो आहे कि जर तुमची लोकांसाठी तळमळीने विकास कार्य करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला विजयी होण्यापासुन कोणीही रोखू शकत नाही, अगदी ‘मोदी लाट’ सुद्धा..!

अधिक वाचा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आंदोलन करणार- अब्दुल सत्तार .

अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची ही बिकट अवस्था पाहून नुकसानभरपाईसाठी आपण आंदोलन करणार असून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त विकास कार्य करणार असल्याचे प्रतिपादन सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – अब्दुल सत्तार.

मतदारांनी विकास कार्याला मतदान केले असून त्यांच्या या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन पूर्व मंत्री व सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

बोरगाव बाजार येथे आ.अब्दुल सत्तार यांचा सत्कार.

सिल्लोड सोयगांवचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांचा बोरगाव बाजार येथे सत्कार करण्यात आला. अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले की तालुक्याच्या विकासासाठी मी नेहमीच वचनबद्ध आहे. तालुक्याच्या विकासासाठी भविष्यामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यावर आपला भर असणार आहे. मतदारांचा आपल्यावर विश्वास होता म्हणून जनतेनी मोठ्या फरकाने माला निवडून दिले आहे.

अधिक वाचा

आ.अब्दुल सत्तार साहेब यांचा पूर्णेश्वर संस्थानाच्या वतीने सत्कार.

विधानसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार साहेब दुसऱ्यांदा प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. या विजयाबद्दल नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा सिल्लोड शहरातील पूर्णेश्वर गणपती संस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अब्दुल सत्तार यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्णेश्वर गणपती संस्थानासाठी विद्युत पोल व रस्त्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.यापुढेही आपण तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे …

अधिक वाचा