बेघरांना मिळणार सुंदर घरे

सिल्लोड शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. इतर भागातील नागरीक नोकरी व व्यवसाया निमित्त येथे स्थायीक होत आहे. सामान्य माणसांना प्लॉट घेवून घरे बांधन शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक बेघरांना हक्काचे घर लाभावे म्हणून हिंदू दलीत बांधवांसाठी खास योजनाबद्ध आराखडा बनविण्यात आला आहे. यासाठी सर्वे नं. ७५ व २९५ मध्ये गरीबांना घरे बांधण्यासाठी आरक्षण मंजूर झाले आहे. या आरक्षीत जागे मध्ये प्रत्येक समाजाचा भावनिक विचार करून सुसज्ज, स्वतंत्र  वस्त्या बांधणार आहेत. या नुतन वस्त्यांमध्ये विद्युतीकरण, रस्ते, सामाजिक सभागृह, मंगल कार्यालये, लहान मुलांना खेळण्यासाठी साधणे, मैदान व वृक्षारोपन येथे केल्या जाईल. तसेच शासनानी दिलेल्या परवानगी नुसार आता येथे दोन मजली घर बांधता येणार असल्याने जास्त लाभार्त्यांना याचा फायदा होणार आहे. येथे मंदिर, मशीद, विहार यासारख्या  लोकवस्तीनुसार धार्मीक स्थळांचा सामावेश असेल.

यासाठी आम्ही राजीव गांधी आवास योजना, एकात्मीक मराठवाडा झोपडपटटी विकास कार्य व म्हाडा अंतर्गत घरकुल योजना सर्वसाधारण कुटूंबांना मिळवून देणार आहोत.

Array4d03b2e4ed3df

House