शहीद संदीप जाधव यांना अखेरचा निरोप.


पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले शूरवीर जवान संदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ‘संदीप जाधव अमर रहे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. केळगाव गोकुळवाडी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब, इतर मान्यवर व हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.