प्रसिध्दीपत्रक

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ.

नाबार्ड योजनेंतर्गत सिल्लोड तालुक्यातील आसडी ते वाकडी या जिल्हा सरहद्द रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, प्रभाकर पालोदकर व अन्य नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा

कॉंग्रेस उमेद्वारांना विजयी करा – आ. अब्दुल सत्तार.

सोयगाव येथे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात सोयगाव शहरातून पदयात्रा काढण्यात आली यावेळी कॉंग्रेसच्या उमेद्वारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.

वाढत्या महागाईला आळा घालण्याची, शेतकऱ्यांचे कर्ज, वीज बिल तसेच विध्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची मांगणी व घोषणाबाजी करत सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आ. अब्दुल सत्तार साहेब व प्रभाकररावजी पालोदकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

अधिक वाचा

सोयगाव येथे कॉंग्रेसची पदयात्रा.

आ. अब्दुल सत्तार व जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सोयगांव येथे प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेसचे सर्व उमेद्वार विजयी करा असे आवाहन आ.अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेला केले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे रावण दहन.

सिल्लोड येथे विजया दशमीनिमित्त खोड़काई मार्ग येथील मोकळ्या जागेत रावण दहन करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

भाजपा कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

अंभई येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कॉंग्रेस पक्षांत प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, जेष्ठ नेते प्रभाकर पालोदकर, माजी आ. कल्याण काळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

अंभई येथील शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद.

सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या शेतकरी मेळाव्यास तालुकाभरातून शेतकरी, सामान्य नागरिक तथा कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमास विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, जेष्ठ नेते प्रभाकर पालोदकर, माजी आ. कल्याण काळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व …

अधिक वाचा

शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करा- आ. अब्दुल सत्तार.

शेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ करण्यात यावे असे मत अंभई (ता. सिल्लोड) येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासंदर्भात सिल्लोड येथील गांधी भवनमध्ये आयोजित बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

शेतकरी मेळाव्यास उपस्थित रहा- आ. अब्दुल सत्तार.

अंभई (ता. सिल्लोड) येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासंदर्भात सिल्लोड येथील गांधी भवनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन.

सोयगाव येथे नवरात्र महोत्सवानिमित्त सोयगाव कुस्ती महासंघातर्फे येथील पंचायत समिती मैदानावर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा