शहराच्या सौंदर्यासाठी

सौंदर्यासाठी सिल्लोड शहराच्या चहू बाजूला नैसर्गीक उंच जागा आहे. शासनाने नविन विकास आराखड्यामध्ये आरक्षीत केलेल्या सर्व नं. २२ मध्ये बागेसाठी जागा आरक्षीत आहे. या नैसर्गीक जागेवर नयनमोहक, वेली फुलांनी, वृक्षांनी पुर्ण गार्डन उभारण्यात येईल तसेच नवीन विकास आराखड्यातील विविध ठिकाणी गार्डनसाठीच्या आरक्षीत जागेवर बाग विकसीत करण्यात येईल त्यात शांत वातावरण, फुलझाडे, बैठकव्यवस्था व नयनमोहक विद्युतरोषनाई केल्या जाईल.
वैशिष्ठ्यपुर्ण योजना, वित्त आयोग योजनेतुन यासाठी ५० लक्ष रुपय कर्च अपेक्षीत आहे.

11
तलाव संवर्धन
शहराच्या प्रगतिसाठी व्यक्तिगत निरोगीपणा अवश्यक असतो. शहराला लागुनच नैसर्गीक पाझर तलाव लाभलेला आहे. या तलावाचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण मंत्री ना. संजय देवतळे यांनी सिल्लोड भेटीदरम्यान सर्वोतोपरी मदत करण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुशंगाने तलाव जलसंवर्धनाच्या दृष्टीकोणातुन येथे भव्य गार्डन, लहान मुलांसाठी पार्क, रनींग ट्रॅक, बोट नैसर्गीक सुशोभिकरण रात्रीचे विद्युत रोषनाई केल्या जाईल.
पर्यावरण विभाग, वित्तआयोग, शहरी रोजगार योजनेतूत यासाठी आर्थिक तरतुद करण्यात येईल. यासाठी अंदाजे १.५० कोटी रुपये खर्य अपेक्षीत आहे.

21