प्रसिध्दीपत्रक

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाचे उद्घाटन.

जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारण कामाचे भूमिपूजन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की शेती व शेतकरी सुखी झाले तर देशाची प्रगती होते. हि बाब लक्षात घेता या योजनेच्या माध्यमातून जलसंवर्धनाच्या कामासाठी गावपातळीवर नियोजन करायला व्हायला हवे.

अधिक वाचा

हरीनाम साप्ताह कार्यक्रमास आ. अब्दुल सत्तार यांची भेट.

माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील वडेश्वर मंदिर येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम साप्ताह कार्यक्रमास भेट दिली. यादरम्यान वडेश्वर मंदिर येथे भक्त निवास बांधण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी ग्रामस्थांना दिले आहे.

अधिक वाचा

वाहून जाणारे पाणी अडविण्याची गरज- आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील डोंगरपट्टयात तापी खोऱ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून या भागातील सिंचन क्षमता वाढविण्याच्या उपाययोजना करण्यासाठी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत.

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा म्हणून कॉंग्रेसपक्षातर्फे वैयक्तिक पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. ही मदत सिल्लोड येथे आयोजित दुष्काळ परिषदेमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, आ. माणिकराव ठाकरे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

अधिक वाचा

दुष्काळ परिषदेस शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद.

सिल्लोड येथील प्रियदर्शनी चौकात शुक्रवारी झालेल्या दुष्काळ परिषदेस जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. अनेक नेत्यांनी यावेळी भाषणे केली. भाजपा सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेले अनुदान हे अत्यंत कमी असून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणीही या परिषदेमध्ये करण्यात आली आहे.

अधिक वाचा

दुष्काळ परिषदेस प्रचंड गर्दी.

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब, आ. माणिकरावजी ठाकरे, विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, सेवादल चे जिल्हाअध्यक्ष विलासजी औताडे, आमदार सुभाषजी झांबड मा.आ.कल्याणरावजी काळे ,जालना लोकसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष अब्दुल समीर इत्यादी नेते हजार होते. या परिषदेमध्ये लोकांशी …

अधिक वाचा

शेतकऱ्यांनी दुष्काळ परिषदेला हजारोच्या संख्येनी उपस्थित रहावे- आ. अब्दुल सत्तार.

दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले अनुदान अत्यंत कमी असून, हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्यायच आहे. ह्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी २३ तारखेला होणाऱ्या दुष्काळ परिषदेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

दुष्काळ परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा- आ. अब्दुल सत्तार.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे २३ तारखेला कॉग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळ परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेवून नागरिकांना दुष्काळ परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

अधिक वाचा

दुष्काळ परिषदेची पूर्वतयारीची पैठणला बैठक.

सिल्लोड येथे २३ तारखेला कॉग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळ परिषदेचे आयोजन केले आहे. या दुष्काळ परिषदेस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या पूर्व तयारीबाबत पैठण येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे …

अधिक वाचा

भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना मदतीची केवळ घोषणा- आ. अब्दुल सत्तार.

पैठण येथे तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी दुष्काळ परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, भाजपा सरकार केवळ मदतीची घोषणा करीत असून प्रत्यक्षात मात्र काहीच मदत करीत नाहीत.

अधिक वाचा