अंधारी येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अब्दुल सत्तार साहेबांची भेट.

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. या संदर्भामध्ये कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार अब्दुल सत्तार व माजी मंत्री नितीन राउत यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेतला.

अधिक वाचा

कोरडवाहू शेती अभियानाचे उद्घाटन.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते राष्ट्रीय शास्वत शेती अभियानांतर्गत घाटनांद्रा येथे कोरडवाहू शेती अभियान व शेतकरी गट संघटन प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानातंर्गत पी.व्ही.सी. पाईप डीझेल इंजिन, विद्युत पंप, तुषार सिंचन दालमिल आदी साहित्य देण्यात येणार आहे.

अधिक वाचा

लोखंडे कुटुंबियांना कॉंग्रेस तर्फे ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत.

विठ्ठल लोखंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर लोखंडे कुटुंबियांचा आधार गेला त्यामुळे या कुटूंबावर दुखा:चा डोंगर कोळला आहे अशा वेळी या कुटुंबीयास कॉंग्रेस पक्षातर्फे ५१ हजार रुपयाची मदत देण्यात आली यावेळी माणिकराव ठाकरे सोबत आमदार अब्दुल सत्तार साहेब उपस्थित होते.

अधिक वाचा

कॉंग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने औरंगाबाद येथे मराठवाडा दुष्काळ परिषद आयोजित केली होती. या परिषेदेमध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपा सरकार निकामी असल्याचे सांगत भाजपा सरकार मध्ये ‘शहरी’ मंत्री असल्यामुळे त्यांना शेतकऱ्याच्या वेदना कशा कळणार असा प्रश्नही उपस्थित केला. भाजपा सरकार ने शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर केली नाही तर कॉंग्रेसच्या वतीने आगामी ८ तारखेला नागपूर येथे हल्ला …

अधिक वाचा

भाजपा सरकारने बहुमत सिद्ध करावे,तालुका कॉंग्रेस कमिटीची राज्यपालांकडे मागणी.

महाराष्ट्र विधानसभेमध्ये दिनांक १२ नोव्हेंबर रोजी भारतीय पक्षाद्वारे मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये भारतीय घटनेच्या तरतुदीचा भंग झाला असून भारतीय जनता पक्षाने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत सिध्द केले नाही त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला पुन्हा बहुमत सिध्द करण्याचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपालांना देण्यात आले आहेत. सदरील निवेदनावर अब्दुल सत्तार …

अधिक वाचा

कॉंग्रेसची आज दुष्काळी परिषद.

शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून शेतकऱ्यांच्या या दुष्काळी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक होण्याचे ठरविले असून याचाच एक भाग म्हणून पक्षातर्फे औरंगाबाद येथे विभागीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

अधिक वाचा

कॉंग्रेसच्या वतीने आज मराठवाडा दुष्काळ परिषद.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने मराठवाडा दुष्काळ परिषद व जवखेडा येथील दालितावरील झालेल्या आन्याला वाचा फोडण्यासाठी औरंगाबाद येथे तापडिया- कासलीवाल ग्राउंड येथे मराठवाडा विभागीय बैठक आयोजित केली असून यामध्ये मराठवाड्यातील सर्व कॉंग्रेसचे माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे संयोजन आमदार अब्दुल सत्तार करणार आहेत.

अधिक वाचा

भूमी अभिलेख विभागामध्ये विविध ९०३ पदासाठी पदभरती.

भूमी अभिलेख विभागामध्ये विविध ९०३ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://oasis.mkcl.org/landrecords2014 या संकेतस्थळाला शेवट दिनांक १ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

कोरडवाहू शेती अभियानांचा आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ.

कोरडवाहू शेती अभियानांतर्गत बहुलखेडा येथील प्रकल्पाचा शुभारंभ आ.अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. कोरडवाहू उत्पादकता व उत्पन्न वाढविणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने या प्रकल्पात सहभागी होऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी आ.अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

मका प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता.

आशिया खंडातील सर्वाधिक मका उत्पादन सिल्लोड तालुक्यात होते. परंतु या तालुक्यात मक्यावर प्रक्रिया होत नाही. शेतकऱ्यांनामिळेल त्या भावाने मका विकावा लागतो. शेतकऱ्यांना जादा भाव मिळावा या उद्देशाने आमदार अब्दुल सत्तार यांनी आघाडी सरकार मध्ये मंत्री असतांना सिल्लोड येथे मका प्रक्रिया प्रकल्प मंजूर करून घेतला आहे.सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी मका …

अधिक वाचा